महाराष्ट्रमुबई

ठाणे येथे एका वृद्ध माणसाची हत्या…

.. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर ठाणे येथील प्रिन्स हॉटेल मध्ये एका वृद्ध माणसाचा खून करण्यात आला. सदर वृत्त असे किठाणे परिसरात प्रिन्स हाॅटेल आहे. या हाॅटेलमध्ये गुजरात येथील राजकोट भागात राहणारे काराभाई सुवा हे काही कामानिमित्ताने आले होते. २७ मे या दिवशी या हाॅटेलमधील खोली क्रमांक ३०३ मध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत काराभाई सुवा यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हाॅटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी सुमारे २० दिवसांपासून कामावर रूजू झालेला राजन शर्मा हा देखील गायब असल्याचे आढळून आले. त्यानुसार, राजन विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.राजन याने केवळ पैशांच्या हव्यासापोटी वृद्धाची हत्या केली. विशेष म्हणजे, त्या वृद्धाने राजनकडे पैसे काढण्यासाठी विश्वासाने डेबिट कार्ड आणि त्याचे परवलीचे अंक (पासकोड) दिले होते. परंतु बँकेतील जमा रक्कम पाहिल्यानंतर राजनने वृद्धाच्या हत्येचा कट रचला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button