महाराष्ट्रमुबई

ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी नाही…..

ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी नाही….. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर बारवी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी कपात लागू केली आहे. या कपातीमुळे दर शुक्रवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे जिल्ह्यातील शहरांना होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा गुरूवार, १५ जून रोजी रात्री १२ ते शुक्रवार, १६ जून रोजी रात्री १२ याकालावधीत बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, वागळे इस्टेट भागातील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २, नेहरुनगर, घोडबंदर येथील कोलशेत खालचा गाव, दिवा आणि मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१ चा काही भाग वगळता) या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांची पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button