दरम्यान आगामी सन उत्सव बकरी ईद, आषाढी एकादशी, सोशल मीडिया, व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पो.स्टे.शेगांव शहर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
आज दिनांक 14/06/2023 रोजी 19.30 ते 20.50 वा. दरम्यान आगामी सन उत्सव बकरी ईद, आषाढी एकादशी, सोशल मीडिया, व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पो.स्टे.शेगांव शहर येथे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी या सणानिमित्त सर्वांनी सतर्क राहुन सन उत्सव साजरे करावे व सोशल मिडियावर धार्मिक भावना भडकावणारे व्हिडिओ, फोटो, मॅसेजेस कोणीही पोस्ट करू नये, आलेल्या मॅसेजची खात्री करावी, तसेच व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व इतर सोशल मिडिया वर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट प्रसारित करू नये, अफवांना बळी पडून कायदा हातात घेऊ नये, आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ, पोस्ट, शेअर करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. तसेच काही आक्षेपार्ह पोस्ट बाबत माहिती मिळताच तात्काळ पोलिस स्टेशन ला कळवावे. गावातील सामाजिक सलोखा कायम टिकवून ठेवावा आणि त्यात कोणी बाधक ठरत असेल तर अशा व्यक्तीची माहिती आम्हाला द्यावी. बैठकीमध्ये उपस्थित सदस्यांना अशा सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीला गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, धार्मिक धर्मगुरू, राजकीय पक्षातील प्रमुख नेते असे एकूण 35 सदस्य हजर होते.
पोलीस निरीक्षक,
पोलीस स्टेशन शेगांव शहर



