श्री गणेश विद्यामंदिर दातिवली शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 96.42% लागला.

श्री गणेश विद्यामंदिर दातिवली शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 96.42% लागला.
शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विद्यामंदिर माध्यमिक विभागाचा शालांत परीक्षेचा मार्च 2023 चा निकाल 96.42 % इतका लागला.
शाळेतून प्रथम क्रमांक आदित्य पांडुरंग डामरे 94.60% , द्वितीय क्रमांक रुपेश अनंत झोरे 91.40 %,
तृतीय क्रमांक आयुष अनिल मोरे 90.20% यांनी प्राप्त केलेत.
तसेच संस्थेच्या माय मदर इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाचा निकाल 99 % इतका लागला असून प्रथम क्रमांक ऋतिक अशोक घुगे 93.80 % , द्वितीय क्रमांक प्रीतीपरना प्रदीप पानीग्राही 88.40% , तृतीय क्रमांक रणजीत हरिश्चंद्र ठाकूर 86.80% गुण मिळवून प्राप्त केले.
या सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा मा. लिलावती म्हात्रे संस्थेचे सदस्य श्री .साईनाथ म्हात्रे सौ.केतकी म्हात्रे , सौ.गीता म्हात्रे श्री. शिवदत्त म्हात्रे, श्री. दिनेश म्हात्रे संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या. शाळेचा निकाल चांगला लागल्यामुळे पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.



