महाराष्ट्र

कृषी आयुक्तालयाकडे प्रशांत डिक्कर यांची मागणी.

बंद पडलेली पोकरा योजना पुर्ववत चालु करा.

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे


शेगांव/ विदर्भ व मराठवाड्यातील एकुण १५ जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी बंद असलेली पोकरा योजना तत्काळ सुरू करा या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कृषी आयुक्तालय पुणे यांचेकडे लेखी निवेदनातून मागणी केली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा, हा प्रकल्प सन १८/१९ पासून २०२३ मार्चपर्यंत सुरळीतपणे सुरू होता, परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून या प्रकल्पात नवीन अर्ज घेणे बंद आहे, तसेस desk 1 – desk 2 – desk 3 वरील सर्व प्रकरणे प्रलंबित आहेत, वास्तविक पाहता आता खरीप हंगाम सुरू झाला आहे, सोयाबीन कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे आधीच मोडले गेले असतांनाच त्यात या प्रकल्पातून ठिबक व तुषार याची सुद्धा पूर्वसंमती बंद असल्याने शेतकरी पुर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे सर्व शेतकरी योजने संदर्भात तालुका कार्यालयात चकरा घालून हैराण आहेत. खरिपाच्या तोंडावर पूर्वसंमती बंद करून शेतकऱ्यांची कोंडी करू नये. शेतकरी हीत लक्षात घेऊन पुर्ववत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी निवेदणातुन केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button