बुलढाणामहाराष्ट्र

मातोश्री पांदन शेत रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ – आमदार राजेश पंडितराव एकडे


स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
————————————- शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा बी बियाणे शेतात ने आण करणे सोयीचे व्हावे यासाठी मलकापूर मतदार संघात मोठ्या संख्येने गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार पांदन रस्ते निर्मिती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मातोश्री पांदण रस्ता विकास कामाला आपण प्राधान्यक्रम दिला आहे हे शेत रस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होणार आहे असे प्रतिपादन आमदार राजेश पंडितराव एकडे यांनी वाडी येथे पांदण रस्ता भूमिपूजन सोहळा प्रसंगी केले. आमदार राजेश एकडे यांचा मलकापूर विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा झंजावात सुरू आहे त्यांनी करोडो रुपयांचा निधी खेचून आणत नांदुरा व मलकापूर तालुक्यात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. आज दिनांक ५ जून रोजी माळेगाव गोंड , वाडी , चांदूर बिस्वा येथे मातोश्री पांदन रस्त्यांचे भूमिपूजन आमदार राजेश एकडे यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते , पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माळेगाव गोंड, वाडी , चांदूर बिस्वा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button