महाराष्ट्रमुबई

वंडर्स पार्कच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी पार्क बंद…..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून या पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.परंतू उदघाटनानंतर पहिल्याच दिवशी पार्क बंद होते. त्यामुळे उद्घाटनानंतर पार्क सुरु झाले म्हणून बुधवारी पार्कला लहान मुलांसह भेट देण्यासाठी आलेल्या नागरीकांचा हिरमोड झाला. बुधवारी सकाळपासूनच दिवसभर सातत्याने नागरीक पार्क सुरु झाले मग प्रवेश का नाही अशी विचारणा करण्यात येत होते.परंतू गुरुवारपासून हे पार्क सुरु होणार असल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता विभागाने दिली आहे. तर दुसरीकडे या पार्कची वेळ वाढवण्याची मागणी स्थानिक नगरसेवक रविंद्र इथापे यांनी प्रशासनाकडे केली आहे.नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण असलेल्या वंडर्स पार्कचे उद्घाटन मंगळवारी झाल्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलांना या पार्कला भेट देण्याची उत्सुकता आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button