बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

कृषी दिनानिमित्त उमाळा येथे वृक्षारोपण व कृषी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी सलमान पठाण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमाळा येथे वृक्षारोपण व कृषी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय, अकोला येथील RAWE कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत “झाडे लावा, झाडे जगवा” हा संकल्प उपस्थितांना देण्यात आला.

यावेळी डॉ. सुकेशनी वाणे, शास्त्रज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी उपस्थित शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना आधुनिक कृषी अवजारे, मूलस्थानी जलसंधारण, कृषी यंत्रसामग्रीचा योग्य वापर तसेच एल-निनो परिस्थितीत शेतीचे नियोजन व पीक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रकाशभाऊ सपकाळ तसेच कृषीताई शुभांगी सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी नागतोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. ईश्वरी नागरे यांनी केले.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचा स्वीकार करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button