बुलढाणामहाराष्ट्र

जिगांव प्रकल्पासाठी 1710 कोटीच्या खर्चास मान्यताआज दि.30 मे 2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेआमदार ॲड आकाश फुंडकर यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या मागणीस यशनागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 293 अन्वये खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात येऊन प्रकल्प़ लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावा अशी मागणी केली होती. त्याला उत्त़र देत मा.उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी, “जिगांव प्रकल्पाला यावर्षीनिधी देण्यात आला आहे. भूसंपादनाची कामे करण्यासाठी सुध्दानिधी देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प़ हाती घेण्यात आले आहेत. सुमारे 7 ते 8 वर्षात हे प्रकल्प़ पुर्ण होतील यामुळे पाण्याचे संघर्ष संपतील. शासन यासाठी निधी उभारल.” असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज दि.30 मे 2023 रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत याबाबतनिर्णय घेत जिगांव प्रकल्पासाठी रु.1710 कोटी खर्चास मान्यता दिली. याबाबत खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहे.जिगांव प्रकल्प़ हा मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प़ असून या प्रकल्पातून केवळ बुलढाणाजिल्हाच नाहीत पश्चीम विदर्भास मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. मागील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या काळात सदरचा प्रकल्प़ मागील अनेक वर्षापासून रखडला होता परंतु राज्यात भाजपा युतीची सरकार आल्यापासूनविदर्भावरील अन्याय दूर करीत मागील अनुशेष भरुन काढत व नवीन प्रकल्पांना मंजूरात देण्याचे काम आदरणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत सुरु आहे. मागील आठवडयात आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेत जिगांव प्रकल्पाला निधी मिळण्याबाबत चर्चा केली यावेळी जिगांव प्रकल्पासाठी आवश्यक़ निधी मंजूर करण्याचे त्यांनी आश्वासन दिले तसेच हा प्रकल्प़ तात्काळ पुर्ण करण्याचे दृष्टीने वेळोवेळी निधी उपलब्ध़ करुन देण्यात येईल् असे ही ते या चर्चे दरम्यान म्हणाले.राज्यात मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेले सर्व महत्वपुर्ण व विकासाभिमुख प्रकल्पाच्या कामांना मागील 10 महिन्यांच्या काळात गती दिली असून महाराष्ट्र पुन्हा विकासाची स्वप्ऩ पाहू लागला आहे. त्याबददल आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button