घरकुल लाभार्थ्यांनी सौ. सुषमा शेगोकार व नितीन शेगोकार यांचे आभार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशासनाच्या घरकुल आवास योजनेचा लाभ अनूसुचित जातीच्या गरजूंना मिळावा याकरिता न.प. कडून सर्वेक्षण व्हावे, यासाठी माजी न.प. उपाध्यक्ष सौ. सुषमा शेगोकार यांनी सतत पाठपूरावा केला. याकामी समाजसेवक नितीन शेगोकार यांनी त्यांना सहकार्य केले. तसेच लाभार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्याकरिताही या | दोघांनी सर्वोतोपरी सहाय्य केले. न.प. कडून लाभार्थ्यांची यादी तयार | झाल्यानंतर त्यांच्या नावांना मंजूरात मिळावी याकरिता आ. डॉ. संजय कुटे यांच्या माध्यमातून बुलढाणा समाज कल्याण सहा. आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला व सहा आयुक्त यांच्याकडून मंजूरात मिळाल्यानंतर घरकुल बांधकामाकरिता निधी मिळण्यासाठी प्रयत्न करून निधी प्राप्त केला. अशाप्रकारे सततचा पाठपुरावा व प्रयत्नांती घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचा धनादेश मिळाला. धनादेश मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी या दोघांच्याप्रति आभार व्यक्त केले असून | लोकप्रतिनिधी असावा तर न.प. उपाध्यक्षा सौ. सुषमा शेगोकार व नितीन | शेगोकार यांच्यासारखा असे तोंडभरून कौतूकही केले आहे.



