जिल्यातील शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीसाठी शासनाने उद्दिष्ट वाढवून द्यावे.प्रशांत डिक्कर

स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
//////////////////////
शेगांव/ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेवटच्या दाण्यापर्यंत नाफेड मार्फत हरभरा खरेदी करण्यासाठी शासनाने जिल्ह्याला हरभऱ्याचे उद्दिष्ट वाढवून द्यावे अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी निवासी जिल्हाधिकारी दिनेश गिते यांचेकडे निवेदनातून केली आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे यावर्षी रब्बी हंगामामधे चांगल्या प्रमाणात हरभऱ्याचे उत्पादन झाले आहे. केंद्र शासनाने २०२२-२३ मध्ये निश्चित केलेल्या दरानुसार बुलढाणा जिल्ह्यात अगोदरच अत्यंत उशिराने हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.त्यातल्या त्यात आज पर्यंत संपूर्ण राज्याकरिता हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले जात असतांना या वर्षी जिल्हास्तरावर हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करून एक प्रकारे शेतकऱ्यांची अडवणुक करण्याची शासनाने भूमिका घेतली आहे.बुलढाणा जिल्ह्या करिता एकूण नोंदणी केलेल्या ९४ हजार ४०५ शेतकऱ्यांपैकी थोड्या प्रमाणातच शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यात काही केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात चालु आहेत तर काही केंद्राचे उद्दिष्ट संपल्याने बंद आहेत. त्यामुळे अजुनही बहुसंख्य शेतकऱ्यांचा हरभरा घरात पडून आहे. बाजारात शेतकऱ्यांच्या हरभऱ्यास हमीभाव मिळत नाही व अत्यंत अल्प दराने त्याला बाजारामध्ये हरभरा विकून नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे हमीभाव योजना असतांना सुद्धा शेतकऱ्यांची लुबाडणूक करून त्याला नागविण्याची भूमिका शासनाची दिसून येत आहे. तरी तात्काळ हरभरा खरेदीचे उद्दिष्टे वाढवून आधारभूत खरेदी दरानुसार नाफेडची खरेदी केंद्रे शेतकऱ्यांचा शेवटच्या दाण्यापर्यंत हरभरा खरेदी होईपर्यंत सुरू ठेवावे. अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.यामधे शासनाची दिरंगाई दिसल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही क्षणी जिल्हाभरात तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सदर निवेदनाच्या प्रती अपर मुख्य सचिव सहकार व पणन मंत्रालय मुंबई व शाखा व्यवस्थापक नाफेड मुंबई यांना पाठवण्यात आल्या यावेळी स्वाभिमानीचे संतोष खेर्डे,सचिन धनोकार,सचिन दिंडोकार, रोशन देशमुख, विशाल सांवत उपस्थित होते.



