गुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

तालखेडा तालुका मुक्ताईनगर येथे दंगल : 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; तीन जण जखमी

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रमोद सौंदळे ) :– सविस्तर वृत्त असे की सौं .नंदाबाई काशिनाथ पाटील यांच्या घराच्या बाहेर येऊन शिवीगाळ करून लाट्या काठ्यांनी तिघांना मारहाण केल्याप्रकरणी तालखेडा येथे 14 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा येथील सौ नंदाबाई काशिनाथ पाटील धंदा शेती यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा येथे त्यांच्या घरी त्यांच्या नातवाचा वाढदिवस साजरा होता त्यांच्या घराच्या बाहेर काहीजण जोरजोरात शिवीगाळ करत असल्याचे लक्षात आले फिर्यादी स्वतः बाहेर येऊन विचारपूस करू लागल्या समोर उभे असलेल्यानी चितावणीखोर भाषा वापरून गोकुळ गजानन धांडे यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला म्हटले की पहिले तुम्ही घराच्या बाहेर या तुम्ही शेत कसे कसता ते तुम्हाला दाखवतो असे बोलून फिर्यादी महिलेचा मुलगा प्रशांतला मारहाण सुरू केली यावेळेस कुटुंबातील फिर्यादी व काही जण आवरण्यासाठी गेले असता त्यांनाही गजानन श्रीराम धांडे पवन गजानन धांडे गोकुळ धांडे सुनील धांडे मयूर धांडे अजय धांडे राजू धांडे विजय धांडे जयेश धांडे संजय धांडे लताबाई धांडे नंदा धांडे कामिनाबाई धांडे पवन राजू धांडे या सर्वांनी लाट्या काठ्यांनी मारहाण केली त्यात फिर्यादी सौ नंदाबाई पाटील तसेच त्यांचा मुलगा प्रशांत पाटील व एक 85 वर्षीय वृद्ध असे तिघेही जखमी झालेले आहेत या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील 25 हजाराचे मंगळसूत्र व दहा ग्रॅमची गहू मणी पोत तुटून पडली. महिलेच्या फिर्यादीवरून तालखेडा येथील 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button