बुलढाणामहाराष्ट्र

आगीत संपूर्ण जळालेल्या घराची आ अँड फुंडकर यांनी केली पाहणी, मदतीचे दिले आश्वासन

* खामगाव ::-* स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, आगीत संपूर्ण जळालेल्या घराची आ अँड आकाश फुंडकर यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीचे आश्वासन दिले. गेल्या आठवड्यात 17मे रोजी श्रीधर नगर घाटपुरी येथील संदीप हिरोलकर यांचे घराला अचानक आग लागली, यामध्ये घरातील सिलेंडर चा स्फोट झाल्याने आगीत संपूर्ण घर आगीत खाक झाले. घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जाळून खाक झाले. आज आ अँड आकाश फुंडकर यांनी संदीप हिरोळकर यांच्या घराची पाहणी केली. यावेळी आ अँड फुंडकर यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी फोन करून संदीप हिरोळकर यांचे कुटुंबियांना तातडीने नुकसानीची मदत घ्यावी असे आदेश दिले. यावेळी तुम्ही खचू नका आम्ही तुमच्या पाठीशी अहो अशी आपुलकी आ अँड फुंडकर यांनी हिरोळकर कुटुंबियांना दिली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, गोपाल ढोले, विष्णू कुलसुंदर, निखिल तायडे, गजानन महाले, ज्ञानेश्वर कुटे, अजय शेळके ,आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button