तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने रोविला झेंडा सभापती सुनील इंगळे तर उपसभापती प्रा प्रदीप ढोले यांची बिनविरोध निवड..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे
दिनांक 23/05/ 2023 ला कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराच्या सभापती पदाची तसेच उपसभापती पदाची निवडणूक झाली या निवडणुकीला निवडणूक अधिकारी एस डब्ल्यू खाडे व त्यांची टीम कार्यरत होती या निवडणुकीमध्ये शेतकरी भाजपा पॅनलने पुरेसे बहुमत नसल्यामुळे आपले अर्ज मागे घेतले परिणामी वंचित बहुजन आघाडीचे सुनील भाऊ इंगळे हिवरखेड हे तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदी बिनविरोध निवडून आले तसेच शेतकरी सहकार महाविकास आघाडीचे प्रा प्रदीप ढोले हे उपसभापती पदी बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीमध्ये शेतकरी भाजपाचे हरिदास वाघ यांनी सभापती पदाकरिता अर्ज दाखल केला होता तसेच निरंजन राजनकार यांनी उपसभापती पदाकरिता अर्ज दाखल केला होता.नंतर विजय झालेल्या उमेदवारांचे ढोल ताशाच्या गजरात आतिशबाजी करत जोरदार अभिनंदन करण्यात आले , निकाल जाहिर झाल्याची माहिती मिळतात संचालक मंडळाचे अशोक बिहाडे दामोदर मार्के विजयाताठोड वंदना वाघोडे श्याम घोंगे मोहन पात्रीकर रवींद्र बिहाडे गौरव वानखडे तसेच महिला वर्ग व इतर पक्षाचे कार्यकर्ते ही उपस्थित झाले होते विजयी उमेदवारांची मिरवणूक काढत जयघोष केला उमेदवारांनी अग्रसेन महाराज टॉवर चौक येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनाही उद्यान मध्ये जाऊन हारार्पन केले या कार्यक्रमांमध्ये खास वंचित बहुजन आघाडीचे कर्तव्यदक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे अकोल्यावरून आलेले होते उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले हा विजय आमचा नसून संपूर्ण शेतकऱ्यांचा झाला आहे तसेच ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केले त्यांचे आभार सुद्धा मानले पुढे आम्ही चांगले कार्य करत राहू असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.



