पंढरपुर येथून देवदर्शन करून घराकडे परत जाणाऱ्या भाविकांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव जवळ वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पिल्लरवर धडकले. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू तर ७ गंभीर भाविक जखमी झाले आहेत. यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याअसल्याने त्यांना अकोल्यात हलविण्यात आले. या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील
भाविकांच्या वाहनाला परतत असताना अगदी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळच मोठा अपघात घडला. आज सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारा वर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार तर 7 भावीक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले आहे..
चालकाला झोप लागल्याने हा अपघात झल्याचेचे समजते.रात्री पासून हा प्रवास सुरु होता. आणि अगदी त्यांच्या घरापासून फक्त २ किलो मीटर अंतर बाकी होते.
दरम्यान शेगावच्या सीमेवर असताना नवोदय
विद्यालयासमोरील देशमुख पंपाजवळ भीषण अपघात होवून तीन भाविक ठार सात जण गंभीर जखमी झाले आहेत.



