मुक्ताईनगर शहरातील योगेश्वर नगर मध्ये विद्युत खांबांवरील लोमकळंनाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका महावितरण लक्ष देणार का?

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-सविस्तर वृत्त असे की दिनांक 19 /2023 रोजी योगेश्वर नगर मधील रहिवासी असलेल्या नऊ वर्षीय बालिकेचा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे परिसरातील सर्व नागरिकांचे मन सुन्न झाले आहे याच परिसरात योगेश्वर नगर मध्येच विजेच्या खांबावरील तारा खाली आलेल्या आहेत घरासमोरील शेडला स्पर्श होऊन कोणत्या क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच परिसरातच अशी घटना घडल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत याकडे मुक्ताईनगर महावितरण लक्ष देईल का? की महावितरण दुर्घटना होण्याची वाट बघत आहे का? बिल भरण्यास विलंब झाला तर तात्काळ येऊन मीटर काढण्याची जशी तत्परता दाखवली जाते, विज पुरवठा खंडित करण्यासाठी जशी तत्परता दाखवली जाते, तशीच तत्परता लोमकळणाऱ्या तारांना व्यवस्थित करण्यासाठी महावितरण तत्परता दाखवेल का? असे सुद्धा योगेश्वर नगर मधील नागरिकांकडून बोलले जात आहे



