गुन्हेगारी

जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न!


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे

पुणेः महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोणालाही दंगली घडवू देणार नाही. दंगेखोरांना अद्दल घडवू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अकोला आणि शेवगाव या दोन्ही ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. सगळीकडे चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे, अशी माहितीही -देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

परिस्थिती नियंत्रणात

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते. जसे लक्षात आले की, अशा प्रकारे काही

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

दंगेखोरांना अद्दल घडवण्याचा इशार

कोणाची तरी फूस

लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहचली. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नसल्याचे ते म्हणाले. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अद्दल घडवू, अशा इशारा त्यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दंगली घडवण्याचे प्रयत्न शंभर टक्के जाणूनबुजून होत आहेत. कोणाच तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते सफल होणार नाहीत. आणि अशाप्रकारे करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांन दिला. काही लोक आग लावण्याच आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे बाहेर आणणार असल्याचे ते म्हणाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button