नाचण्याच्या वादातून आपसातभिडले वऱ्हाडी तुंबळ हाणामारी

रिसोड शहरातील मालेगाव नाका येथील घटना.
दगडफेक तोडफोड
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम /रिसोड : वरातीत डीजेसमोर नाचण्यावरून झालेल्या वादातून दगडफेक व तोडफोड झाल्याची घटना रिसोड शहरातील मालेगाव नाका येथे ७ मे रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली. या घटनेनंतर काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणून प्रकरण शांत केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज 7 मे रोजी विवाहाची तारीख असल्याने रिसोडमधील जवळपास सर्वच संस्थान व विविध ठिकाणी विवाह सोहळे होत होते. अशा स्थितीत मालेगाव नाक्यावर डीजेच्या तालावर दोन वर एकमेकांच्या मागे लग्नस्थळी निघाले होते. अशा स्थितीत तेथे नाचण्यावरून वाद झाला आणि वऱ्हाडी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दगडफेकही करण्यात आली असून एका वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या.या घटनेची माहिती रिसोड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. मात्र या घटनेमुळे मालेगाव नाका येथे घबराहटीचे वातावरण निर्माणझाले होते.



