शेगाव तहसील कार्यालयातील गोरगरिबांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष गौतम प्रभाकर खंडारे यांनी आज तीन मे पासून

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे विधवा महिला ंची धनादेश चार महिन्यापासून अद्याप पर्यंत गरजू विधवा महिलांना न देणे संजय गांधी निराधार योजनेच्या केसेस ऑनलाइन झाल्यावर त्या पास करण्यासाठी आवश्यक सही शिक्का मारण्या ची आवश्यकता असते त्यांना शिक्का मारणे कामी टाळाटाळ करणे शेगाव शहरातील इंदिरानगर मध्ये इसवी सन 2022 नैसर्गिक आपत्तीमुळे घरांची झालेली फळझाड अनुदान अद्याप न मिळणे मुरारका शाळेजवळ पंधरा-सोळा वर्षापासून वास्तविक असलेल्या रहिवाशांना विजेचा पुरवठा न करणे आदी विविध कार्यामध्ये नागरिकांना त्रास देणाऱ्या शेगाव तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष गौतम प्रभाकर खंडारे यांनी आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे



