तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील माकोडे दांपत्यांचा…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
तेल्हारा.दि.1 तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील माणिकराव रूपचंदजी माकोडे व सौ कमलाबाई माणिकराव माकोडे या दांपत्यांचा 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे अवचित साधून सामाजिक समरसता मंच अकोला जिल्हा यांच्या वतीने अग्रसेन भवन अकोला येथे कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान व्हावा म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तेथे या दांपत्यांना सन्मानित करण्यात आले.
माणिकराव रूपचंदजी माकोडे व सौ कमलाबाई माणिकराव माकोडे यांनी कबाळ कष्ट करून आपल्या मुलाला पीएसआय बनवले आज रोजी सचिन माणिकराव माकोडे हे अमरावती येथे कार्यरत आहेत याच कार्याची जाण ठेवून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समता युक्त समाज रचनेसाठी समाजाच्या उत्कर्षासाठी आणि संपूर्ण समाज समरस होऊन राष्ट्रीय विचारधारेच्या प्रवाहात सतत कार्यरत असावा यासाठी सामाजिक समरसता मंच विविध कार्यक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करीत असते या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील ज्या व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून पद प्रतिष्ठा किंवा गुणवत्ता प्राप्त केली आहे अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याकरिता या सोहळ्याचे आयोजन एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने केले होते.ह भ प शिरीष महाराज मोरे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे विद्यमान 11वे वंशज कीर्तनकार प्रवचनकार श्री शेत्र देहू यांच्या हस्ते माकोडे दाम्पत्यांना शाल श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी पीएसआय सचिन माणिकराव माकोडे साहेब अमरावती येथे कार्यरत असल्यामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित होते.✍️.



