बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रेतीची अवैध वाहतुक; टिप्पर जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव |

पिंपळगाव राजा येथील काही दिवसांपासून अवैध गौण खनिजाची मोठ्याप्रमाणात वाहतूक केली जात आहे. रेतीची चोरटी वाहतूक केली जात असतानाच, पिंपळगाव राजा पोलीसांनी ३ ब्रास अवैध वाळूसह एक टिप्पर जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल

तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा येथील लहान पुलाजवळ सोमवारी

रात्री ११ वाजता दरम्यान, नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील

श्रीकृष्ण रमेश जाधव एमएच २८ बीबी ३००२ या वाहनातून रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातील टिप्परसह तीन ब्रास चोरीची रेती असा एकुण १२ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी विरोधात भादंवि कलम ३७९, सहकलम ३ (१), १८१ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button