महाराष्ट्रविदर्भ

माळेगाव बाजार येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे व अखंड हरिनाम ज्ञानयज्ञाचे आयोजन

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे साध्वी चंपा माता यात्रा महोत्सव निमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे व अखंड हरिनाम ज्ञानयज्ञाचे आयोजन दिनांक 29/ 4 /2023 शनिवार पासुन ते दि .6/5/2023 पर्यंत करण्यात आले आहे. हा महोत्सव 24 वर्षापासून साजरा करत असून या वर्षी भागवत कथेचे व्यासपीठ नेतृत्व ह भ प गोदावरीताई बंड रा. सस्ती तालुका बाळापूर ह्या करतील , आठवडाभर चालणार्या या कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा :- काकडा सकाळी 5 ते 6. भागवत प्रवचन सकाळी9 ते 10 दुपारी 3 ते 6 या कालावधीत राहणार. हरिपाठ संध्याकाळी 6 ते 7या दरम्यान राहणार. हरिकीर्तन रात्री 8:30 ते 11 वाजेपर्यंत राहणार अशी दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा असून उद्या दिनांक 29/ 4 शनिवार रोजी ह. भ. प .साक्षीताई प्रकाश भोपळे माळेगाव बाजार यांचे कीर्तन राहणार आहे. दिनांक 30/ 4 शनिवार रोजी ह.भ.प प्रमोद महाराज राहणे पळशी यांचे कीर्तन राहील .दिनांक1/5 सोमवार रोजी ह भ प किशोर महाराज काळे .तामसी बाळापूर यांचे कीर्तन राहील दिनांक 2/5 मंगळवार रोजी ह भ प कृष्णा महाराज पाटील वाघुळ यांचे किर्तन राहील. दिनांक 3/5 बुधवार रोजी ह भ प अरुण महाराज लांडे पारस यांचे कीर्तन राहील. दिनांक 4/5गुरुवार रोजी ह भ प शालिग्राम महाराज सुरडकर मालेगाव यांचे कीर्तन राहील. दिनांक 5/5 शुक्रवार गुरुवर्य ह भ प तुकाराम महाराज सखारामपुर यांचे कीर्तन राहील. दिनांक 6/ 5 शनिवार रोजी ह भ प गोदावरीताई बंड सस्ती बाळापुर. यांचे काल्याचे किर्तन राहील तसेच हरिपाठ व काकडा :- ह भ प ज्ञानेश्वर महाराज दाते सावरगाव, ह भ प सुभाष महाराज बोंबटकर वाडगाव वान. गायणाचार्य:- ह भ प विजय महाराज कुयटे गाडेगाव. ह भ प अशोक महाराज राऊत वडगाव वान. मृदंगाचार्य:- ह भ प शुभम महाराज गायकी रुधाना वकाना, ह भ प श्याम महाराज काळमेघ चौसाळा, ह भ प ज्ञानेश्वर महाराज राऊत वडगाव वान. दिनांक6/5 शनिवार रोजी दुपारी 3 वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल यामध्ये मातेची पालखी मंदिरातून नगरप्रदक्षिणा निघेल तसेच महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी6 ते आगमनापर्यंत माळेगाव बाजार येथे करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे आयोजन: – साध्वी चंपा माता मंडळ समस्त गावकरी मंडळ माळेगाव बाजार तालुका तेल्हारा यांनी केलेआहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button