महाराष्ट्रविदर्भ

दिवठाणा व काळेगाव परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीने बळीराजाचे प्रचंड नुकसान


काल दिनांक २६/४/२०२३रोजी झालेल्या वादळी वारा गारपीट व अवकाळी पाऊसामुळे दिवठाणा, काळेगाव ,वरणा निमकवळा, नांद्रि या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.केळी पिकाचे अंदाजे 60 हेक्टर ,तसेच मका, कांदा, भाजीपाला या पिकाचे अंदाजे 80 हेक्टर पिके असून या पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले. आहे यावेळी पिकांचे नुकसान पाहण्यासाठी काळेगाव मंडळ अधिकारी गायकवाड काळेगाव तलाठी शिंदे साहेब व तारकसे मॅडम माजी सरपंच विलास भाऊ इगळे पोलीस पाटील गोपाल बोदळे शाम भाऊ गायगोळ यांच्या शेतात कादा टोळ पाहताना शेतकरी बांधव,

यांनी शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. झालेल्या प्रचंड नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्यावरील अस्मानी संकटाची मालिका संपता संपत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे शासनाने लवकरात लवकर
झालेल्या पिकाची नुकसान भरपाई ध्यावीअशी मागणी सर्व शेतकरी बांधवांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button