महाराष्ट्रविदर्भसामाजिक
बसपाच्या पुढाकाराने उपोषणाची घेतली दखल अखेर चौथ्या दिवशी उपोषणाची सांगता

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगांव : – मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत झालेल्या नित्कृष्ट कामाचे वर्षापासून खटाटोप केल्याप्रकरणी दिनांक 24 तारखेला उपोषणास बसले असता कुठल्याही अधिकाऱ्यांनी याची दखल न घेता मात्र चौथ्या दिवशी बसपाने त्वरित यांना पाठिंबा देऊन कार्यकारी अभियंता मिठेवाड साहेब यांना बोलून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भाऊ ताजने व अविनाश भाऊ वानखेडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन लेखी स्वरूपामध्ये अधिकाऱ्याच्या उपोषणाची सांगता केली लवकरात लवकर चौकशी समिती नेमून कार्यवाही संबंधात श्रेणी एक अभियंता मालेगाव व कार्यकारी अभियंता मिठेवाड साहेब वाशिम यांच्याशी लेखी पत्र घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.



