खानदेश

तेल्हारा येथे सार्वजनिक मैत्रेय वाचनालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची 196 वि जयंती साजरी.

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता.प्रतिनिधी✍️तेल्हारा दि11. सार्वजनिक मैत्रेय वाचनालय तेल्हारा येथे दि.11/04/2023 मंगळवार रोजी.सामाजीक क्रांतीचे अग्रदुत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची 196वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथमित्र रामेश्वर पोहेकर गुरुजी होते ते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना म्हणाले, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या जीवनात सामाजिक प्रबोधन ,अस्पृश्यता, व जाती व्यवस्थेचे निर्मुलन आणि शिक्षण देण्याचे कार्य केले तसेच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि जीवनात विद्येचे किती महत्त्व आहे हे त्यांनी समाजाला आपल्या जीवन कार्यातुन सांगीतले.या महामानवांची जयंती साजरी करण्याचा उद्देश फक्त त्यांचे विचार आपनासर्वांपर्यंत पोहचावे हाच एक द्रुष्टिकोण असुन पुढे ते आवर्जुन म्हणाले की,”सज्जन माणूस जन्माला येणं हा एक योगायोग आहे, परंतु तो स्वतःसाठी किती जगला यापेक्षा तो समाजासाठी कसा जगला याला जास्त महत्त्व आहे ” तसेच . डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा विचार मांडत ते म्हणाले, जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्या आणि दुसऱ्या रुपयाची पुस्तके घ्या,भाकर तुम्हाला जिवण जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला जीवन कसे जगायचे हे शिकवेल. या थोर विचारवंतांच्या विचारातुन बोध घेऊन आपल्या जीवनात तसे कार्य करत रहावे असे म्हणत त्यांनी आपले अध्यक्षक्षीय भाषण संपवले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिष बिहाडे यांनी केले,यांच्यासह कार्यक्रम यशस्वीते करिता सचिन दारोकार यांनी परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन अक्षय शामस्कर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button