महाराष्ट्र

ढोरपगांव येथील प्रवासी निवाऱ्यात युवकाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव एका ३५ वर्षीय युवकाचा प्रवासी निवाऱ्यात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथे रविवारी रात्री घडली.रामा एकनाथ साबे रा. सुटाळा असे मृतक युवकाचे नाव आहे. ढोरपगाव शिवारात शेती असल्यामुळे रविवारी तो शेतीच्या मशागती साठी गेला होता. दरम्यान पाऊस आल्यामुळे रात्री तो ढोरपगाव येथील प्रवासी निवाऱ्यात थांबला होता. तितक्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तत्पूर्वी युवकाचे ढोरपगाव येथील नातेवाईक घटनास्थळी पोहोचले होते.घटनेची माहिती मिळताच, पिंपळगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामाकरून युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button