बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

*शेगाव तालुक्यात वादळीवाऱ्यासह गारपिटीचा पाऊस*

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

-अवकाळी पावसाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थैमान घातले आहे त्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे शेगाव तालुक्यात अति दृष्टी वादळासह गारपीट पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेगाव वरवट रोडवरील कालखेड रोडवरील वादळी वाऱ्याने मोठे झाडे कोसळल्यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते. विजेच्या खांबावर झाड पडल्याने तालुक्यातील विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता गोळेगाव बु।येथे वादळी वाऱ्यासह गारपीट गहू, कांदा पिकांचे नुकसान गावातील टिनपत्रे उडाली व झाडे सुद्धा पडली आहेत. तसेच राजू किसन समदूर यांच्या बैलाच्या अंगावर लिंबाचे झाड कोसळल्याने  बैलांना गंभीर दुखापत झाली.
तसेच कालखेड येथील भोंनाबाई पुनाजी समदूर घरावरील टिनपत्रे उडून गेले. वाऱ्याचे प्रमाण व पावसाच्या प्रमाण जास्त असल्या कारणाने घरातील धान्य फुले झाले. व घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आहे. तालुक्यात जवळपास सर्वच गावांमध्ये वादळी पावसामुळे व वाऱ्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी नुकसान झाले. प्रशासनाने तालुक्यात नुकसानाची चाचणी करून शेतकरी व ग्रामस्थांना झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी  मागणी तालुक्यातून शेतकऱ्याकडून ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button