(वाशिम):मालेगाव:-वंचित बहुजन आघाडीची तालुका मालेगाव ची आढावा सभा वंचित बहुजन आघाडी कार्यालय मालेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली

मालेगाव (वाशिम):मालेगाव:-वंचित बहुजन आघाडीची तालुका मालेगाव ची आढावा सभा वंचित बहुजन आघाडी कार्यालय मालेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली
वंचित बहुजन आघाडीचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पक्षाच्या वतीने साजरी करणे बाबत आदेश दिले होते पक्षाच्यावतीने जयंती साजरी करणे संदर्भात वंचित बहुजन आघाडीची दिनांक 8 एप्रिल रोजी पक्षाच्या मालेगाव येथील कार्यालयात नियोजन सभा बोलण्यात आली या सभेला तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली यावेळी नियोजन सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशा कशाप्रकारे साजरी करायची याबद्दलचे विचार तालुक्यातील पदाधिकारी जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी मांडले सर्वमते असे ठरले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये साजरी करायची या नियोजन सभेला तालुकाध्यक्ष सारनाथ भाऊ अवचार ,तालुका महासचिव राजूभाऊ जमदाडे जिल्हा प्रवक्ते संदीप भाऊ सावळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ खंडारे ,तालुका सचिव राहुल कांबळे ,तालुका उपाध्यक्ष संजय गायकवाड, तालुका उपाध्यक्ष कैलास ढाले तालुका उपाध्यक्ष संजय गवांदे तालुका कार्यकारणी सदस्य केशव गायकवाड तालुका प्रसिद्ध प्रमुख सुमेध वानखेडे मार्गदर्शक एडवोकेट साळुंखे यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन तालुका सचिव राहुल कांबळे यांनी तर आभार तालुका उपाध्यक्ष संजय भाऊ गायकवाड यांनी मानले.




