विद्यार्थ्यांनी स्वतःला अभ्यासात समर्पित करा!

प्राचार्य अशोक थोटांगेस्वाभिमानीच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संग्रामपूर/ जिद्द आणि चिकाटी या गुणा बरोबर विद्यार्थ्यानी स्वतः ला अभ्यासात समर्पित केले तरच आजच्या स्पर्धात्मक युगात तुमचा टिकाव लागेल आणि यश तुमच्या पायाशी निश्चितपणे लोळण घेईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राबविला निबंध स्पर्धे चा उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब थोटांगे यांनी केले.दि.६ एप्रिल रोजी संत गुलाबबाबा विद्यालयात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.या वेळी आयोजित कार्यक्रमा साठी तहसीलदार मुरलीधर गायकवाड ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर,रोशन देशमुख,गोपाल रहाटे, गोकुल गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रथमतः संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून हारार्पण करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील अनेक शाळेत ८ मार्च या महिला दिनाच्या निमित्ताने मुलींसाठी निबंध स्पर्धे चे आयोजन करण्यात आले.प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात हि स्पर्धा घेण्यात आली.भारताच्या विकासात महिलांचे योगदान,या विषयावर हि स्पर्धा घेण्यात आली. यावेळी गुलाबबाबा विद्यालयातून माध्यमिक गटात समृद्धी मोहन व्यवहारे प्रथम,आर्या प्रवीण देशमुख द्वितीय,वेदिका अर्जुन गोमासे तृतीय,तर प्राथमिक गटात श्रावणी संतोष मोवाड प्रथम,राशी निलेश देशमुख द्वितीय, ख़ुशी हरिदास कुकडे तृतीय या आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.तर प्रस्ताविकातून सहा शिक्षक आशिष चरखे यांनी आयोजनाचा हेतू व उददेश कथन केला.कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी केले.कार्यक्रमासाठी विजय राजनकार,प्रल्हाद हागे,लक्ष्मण लोमटे,संदीप राऊत,शांतशील दामोदर,अनिल ढोकने,सत्वशील आंबीलडिंगे,सौ.संजीवनी वानखडे,कु दीपाली तायडे,सदाशिव घुगे,दीपक सदाफळे,यांचे सह बहुतांश शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




