*तेल्हारा शहरातील भीमराव परघरमोल यांचा मा सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या हस्ते सन्मान*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता प्रतिनिधी विजय घोडे
तेल्हारा शहरातील व्याख्याते भीमराव परघरमोल गुरुजी यांचा मा.सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम दिल्ली यांच्या हस्ते आबासाहेब खेडकर सभागृह अकोला येथे दि.31/03/2023 ला चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान तर्फे सन्मान करण्यात आला. चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय अशोक पर्व या महोत्सवाचे आयोजन आबासाहेब खेडकर सभागृह अकोला येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा एम आर इंगळे तर प्रमुख अतिथी राजेंद्रपाल गौतम मा.सामाजिक न्याय मंत्री दिल्ली तर मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले प्रा.बाळकृष्ण खंडारे उपाध्यक्ष,प्रा.सुनील कांबळे सचिव यांच्यासह प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी व आमंत्रित मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती राजेंद्रपाल गौतम यांनी देशात बहुजनांना शिक्षण, रोजगार तथा इतर हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र होत आहे असे क्रांतिकारी विचार यावेळी त्यांनी प्रगट केले पुढे ते देशाला युद्धाची नवे तर बुद्ध विचारांची गरज आहे. 2050 पर्यंत बौद्ध धम्माचे वैश्विक स्वरूप बघायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच त्या काळात बांधलेले 84 000 स्तूप कालांतराने जमिनीत गाडल्या गेले त्यामुळे बौद्ध धम्म फक्त भारतातच नाही तर जगात जमिनीवर आणि जमिनीखाली सुद्धा आहे असे ते आपल्या मुख्य अतिथीय भाषणात बोलत होते या कार्यक्रमांमध्ये प्रदीप चौरे, डॉ संतोष पेठे ,दगडू वाहूरवाघ,ॲड देवानंद गवळी डॉ संतोष तायडे तहसीलदार राहुल तायडे, रोहित जगताप आकाश पवार ॲड संतोष बोरे निरंजन वाघोडे प्रा डॉ मंगला बोराळे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच . व्याख्याते भीमराव परघरमोल. यांचे समाज हितास्तव केलेले कार्य पाहून त्यांना साहित्यरत्न पुरस्काराने तसेच सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले .कार्यक्रमाचे उद्घाटन भिक्षु संघाच्यावतीने धम्म ध्वजारोहण व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रा डॉक्टर संदीप भोवते. होते पू भिकू ज्ञानज्योती यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सम्राट डोंगरदिवे डॉक्टर संतोष बनसोड डॉक्टर विलास तायडे डॉक्टर रवींद्र मुंद्रे समाज कल्याण अधीक्षक सुरेंद्र तिडके प्रा डॉक्टर वसंत डोंगरे प्रा डॉक्टर बी एच. किर्दक दिशा गवळी मोहन बेलसरे प्रदीप चौरे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आयोजन प्राध्यापक विजय आठवले यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर संतोष बनसोड यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा खंडारे यांनी केले



