शेगाव कृउबास निवडणूक; १८ जागांसाठी ११२ अर्ज( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी होत आहे. या निवडणूकची प्रक्रिया सुरू असून ३ एप्रिल रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी ११२ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जात सहकारी मतदारसंघातून संस्था सर्वसाधारण जागेसाठी ३६ अर्ज, महिला प्रवर्गातून ९, विमुक्त जाती भटक्या जमाती
प्रवर्गातून ९ असे ६२ अर्ज प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण प्रवर्गातून २२ अर्ज, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून ८ अर्ज, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून ८ अर्ज, असे ३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी व अडते मतदारसंघातून ७ अर्ज हमाल व व्यापारी मतदारसंघातून ५ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकारी संस्था मतदारसंघाच्या 99 जागा
ग्रामपंचायत मतदार संघाच्या ४ जागा हमाल व्यापारी मतदारसंघाचे १ जागा, व्यापारी व अडते मतदारसंघाचे २ जागा, अशा १८ जागा असून, ३ एप्रिलला प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची ५ एप्रिल रोजी छाननी होणार आहे. तसेच ६ ते २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील २१ तारखेला चिन्ह वाटप होणार असून ३० •एप्रिलला दुपारी ४ वा. पर्यंत मतदान राहील. त्यानंतर लगेच त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर होणार आहे. (ता.प्र.)



