महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर अपघात; दोन डॉक्टर मुलींसह तिघे ठारभरधाव कार ट्रकवर आदळली

मालेगावच्या बाप-लेकीचा जागीच
मृत्यू

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम /मालेगाव

वर्धा : अकोला येथील इंटरचेजवरुन समृद्धी महामार्गावर चढलेल्या भरधाव कारने नागपूरकडे जाणाया  ट्रकला मागाहून जबर धडक दिली. या धडकेत दोन महिला डॉक्टरसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील कोटंबा फाट्याजवळ रविवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.
भारत क्षीरसागर व डॉ. ज्योती भारत क्षीरसागर दोघेही रा. मालेगाव आणि डॉ. फाल्गुणी सुरवाडे रा.अमरावती असे मृताचे नाव आहे. डॉ. ज्योती ही भारत यांची मुलगी असून डॉ. फाल्गुणी ही ज्योतीची मैत्रिण आहे. दोघीही दंत चिकित्सक असून तिघेही एम.एच. ३७ जी. ३५५८ क्रमांकाच्या कारने नागपुरला जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार अकोला येथील इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर चढली. ही भरधाव कार सेलू तालुक्यातील कोटंबा फाट्याजवळ समोरील एम.एच.०४ डी.एल. ८२३५ क्रमांच्या ट्रकवर आदळली. धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग चकनाचूर घाला. यात कारमधील तिघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचायांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button