तेल्हारा शहरात संस्कार भारती समिती ने केले भरतनाट्यम् नृत्य व बासरी वादन कलेचे आयोजन

*तेल्हारा शहरात संस्कार भारती समिती ने केले भरतनाट्यम् नृत्य व बासरी वादन कलेचे आयोजन*
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता.प्रतिनिधी विजय घोडेतेल्हारा शहरामध्ये संस्कार भारती समितीच्या वतीने गुढीपाडवा निमित्त “चैत्र सांज पाडवा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेल्हारा शहरांमध्ये प्रथमच भरतनाट्यम नृत्य व बासरी वादन या दोन कलेचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून माता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम जोशी हे होते प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रा. माणिकराव कवरकेसर होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या तेल्हारा तहसीलच्या पुरवठा निरीक्षक रूहीना अली मॅडम होत्या या कार्यक्रमाला संस्कार भारती समितीचे तेल्हारा शाखेचे कार्याध्यक्ष अविनाश मोहिते सर तसेच संस्कार भारती समितीचे जिल्हाध्यक्ष चैतन्य जी नळकांडे सर, संस्कार भारती समितीचे अध्यक्ष ठोंबरे सर तसेच कलाकार म्हणून नारायणी ताई जाफराबादकर भरतनाट्यम् तर बासरी वादक कलाकार आशिष जी उमाळे होते. कार्यक्रमामध्ये सत्कारमूर्ती म्हणून लाभलेले सुवर्णपदक प्राप्त क्रीडा जगता मध्ये नाव लौकिक करुन उत्तम कामगिरी करणारे तेल्हारा तालुक्यातील टाकळी ग्रामचे गजाननराव पात्रीकर गुरुजी होते, यांचा सत्कार संस्कार भारती समितीच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमामध्ये संस्कार भारती समिती चे मुख्य कार्य भारतीय संस्कृतीचे जतन करणे संवर्धन करणे तसेच नवोदितांना मंच उपलब्ध करून देणे आहे असे संस्कार भारती समितीचे अध्यक्ष ठोंबरे सरांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले, कार्यक्रमांमध्ये कलाकार म्हणून लाभलेले विद्या राव यांचे शिष्य भरत नाट्यम् नृत्याचे विशारद पदविका प्राप्त नारायणी जाफराबादकर यांनी पाच प्रकारांमध्ये भरतनाट्यम् नृत्य सादर केले त्यामध्ये शब्दम् ,किर्तनम् ,आवली इ. प्रकारचे नृत्य नारायणी जाफराबादकर यांनी मंचावर सादर केले,त्यांनी भरतनाट्यम् च्या तिल्लाना या प्रकाराने नृत्याचा शेवट केला ,भरतनाट्यम् या कलेला दोन हजार वर्षाचा इतिहास प्राप्त आहे, कार्यक्रमांमध्ये दुसरे कलाकार म्हणून लाभलेले अशिषजी उमाळे बासरी वादक हे अकोला चे असून, आशिष उमाळे यांनी आर एल टी कॉलेज अकोला येथून पदवी प्राप्त केली आहे त्यांना सुरेश डोंगरे प्रशांत आगरीहोत्री प्रवीण गोळखिंडी यांच्या विचारांपासूनपासून प्रेरणा मिळाली, आशिष जी उमाळे यांचे बासरी वादन ऑरेंज रेडिओ, रेडिओ सिटी ,अकोला आकाशवाणी, आस्था टीव्ही ,टीव्ही नाईन इत्यादी ठिकाणी त्यांचे कार्यक्रमाचे सादरीकरण झालेले आहे. नुकताच त्यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे.कार्यक्रमामध्ये त्यांच्या सह तेल्हारा येथील बासरी वादक सहकारी म्हणून लाभलेले कलाकार सुमित वासनकार व समुह होता, त्यांनी आपल्या सुमधुर बासरी वादना तून उपस्थितांना मोहित केले सध्या सोशल मीडियावर प्रचलित असलेली रामायण मालिकेतील “हम कथा सुनाते है राम सकल गुणधाम कि ” या गीताची बासरी धुन. आपल्या कलेतून सादर केली त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा खळखळाट करून जोरदार दाद दिली . संस्कार भारती समितीच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी भोपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मीनाताई बासोळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्कार भारती समितीचे सदस्यांनी परिश्रम घेतले



