विदर्भ

गोळेगांव बु येतील शेतकऱ्याची आत्महत्या

*गोळेगांव बु येतील शेतकऱ्याची आत्महत्या*

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )शेगाव तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक येथील तुळशीराम नांदोकार शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. १५ ३ २०२३ रोजी अंदाजे दीड च्या दरम्यान एका बाभळीच्या झाडाला या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना पोलिसांना कळविण्यात आल्याने त्यांनी लगेच या घटनेचा तपास करीत, या गळफास घेतलेल्या व्यक्तींची बॉडी शवविच्छेदनाला सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय शेगाव हलविण्यात आले.शेतकऱ्याच्या नावे दोन एकर शेती असून सेंट्रल बँक ऑफ मनसगाव शाखेचे शेतकऱ्याचे खाते आहे. सततच्या निसर्गाच्या अभावामुळे व अवकाळी पावसाने हे कर्ज सतत वाढल्याने कर्जाचा बोजा झाल्यामुळे शेतकऱ्यांनीही टोकाचे पाऊल उचलले असे बोलले जात आहे. तुळशीराम नांदोकार त्यांच्या पश्चात तीन मुले व एक पत्नी असा परिवार आहे त्यांच्या गेल्याने गावात व परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button