गुन्हेगारीबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भ

अल्पवयीन मुलीवर युवकाचा अतिप्रसंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगांव तालुक्यातील गौलखेड येथे एका युवकाने अल्पवयीन कुमारीकेला घरी बोलावून तिला गुंगीचे औषध दिले व तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना १४ फेब्रुवारी २३ रोजी दुपारी १२.३० वा.च्या सुमारास घडली.यासदंर्भात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अल्पवयीन मुलगी औषधी घेण्याकरीता आरोपीच्या घरासमोरून जात असतांना आरोपीने तीला आपल्या घरी बोलावून तीला गुंगीच्या गोळ्या दिल्या व तीच्यावर अतिप्रसंग केला. तसेच याबद्दल कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी गणेश प्रल्हाद शेजोळे रा. गौलखेड याचेविरूध्द कलम ३७६ (१) ३५४ड, ३२८,३४२,५०६ भादंवी सहकलम ४, १२ पोस्को, सहकलम 3(1) W (i) (ii), 3(2) (VA) (3) (2) (5) अजाजअप्रका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून ग्रामीण पोलिस त्याचा शोध घेत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button