गुन्हेगारी

तेल्हारा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा

ता. प्रतीनीधी विजय घोडेतेल्हारा; तेल्हारा तहसील अंतर्गत बिल्डिंग मटेरीयल सप्लायर गोपाल महेश छांगाणी रा. तेल्हारा व यांचा मित्र निखील बलरामसींग ठाकूर रा .माळेगाव बाजार यांना गेल्या काहि दिवसा पासुन तेल्हारा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक, वैभव फुलचंद जोहरे वय 29 रा. चिखली बुलढाणा ह.मु गाडेगाव रोड तेल्हारा, यांनी पैशांचा तगादा लावून त्रस्त केले व व्यवसाय करणे कठीण करून टाकले होते.म्हणून त्रस्त गोपाल महेश छांगाणी यांच्या दिलेल्या माहितीनुसार ,”अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा” यांच्या नियोजीत सापळ्यात 30,000 रुपयांची लाच मागणी केल्या बद्दल तेल्हारा तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक वैभव फुलचंद जोहरे वय 29 रा. चिखली बुलढाणा ह.मु गाडेगाव रोड तेल्हारा हे अडकले.सविस्तर वृत्त असे कि,तेल्हारा शहरातील नागरिक गोपाल छांगाणी वय वर्ष 24 यांचा बिल्डिंग मटेरियल सप्लाय चा व्यवसाय असून हे आपला व्यवसाय करत असताना तेल्हारा तहसील येथे कार्यरत असलेले महसूल सहाय्यक वैभव फुलचंद जोहरे वय 29 रा. चिखली जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम गाडेगाव रोड तेल्हारा ,यांनी व्यावसायिक गोपाल छांगानी त्यांचा मित्र निखील बलरामसींग ठाकूर यास महिन्याकाठी दहा हजार रुपये जमा करण्यास सांगुण त्रस्त करत होते तसेच रुपये न दिल्यास 407 या मालवाहू वाहनावर कारवाई करेल असे म्हणत असे, म्हणून ह्या त्रासाला कंटाळून गोपाल छांगानी यांनी एसीबी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा येथे तक्रार देत संपर्क साधून अवगत केले आणि मार्गदर्शन मागितले असता एसीबी बुलढाणा चे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी ,यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला आणि त्यानुसार पुढील कारवाईस सुरुवात करण्यात आली, दिनांक 17/3 2023 रोजी शेगाव नाका तेल्हारा येथे त्या कर्मचाऱ्यास, प्रत्यक्ष लाच मागणी रक्कम 30 हजार रुपये घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्या कर्मचाऱ्यास संशय आल्यामुळे तो पैसे घेण्यास टाळाटाळ करीत होता परंतु या पूर्वनियोजित सापळ्यात कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वार्तालापाचे टॅपिंग असल्यामुळे या कर्मचाऱ्यास बुलढाणा एसीबी चे उपअधीक्षक संजय चौधरी यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना लेखी पत्राद्वारे अटक करण्याबाबत सूचित केले आणि त्यानुसार स्थानिक तेल्हारा पोलिसांनी कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार अटक केली या मध्ये अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा चे उपअधीक्षक संजय चौधरी, गजानन वासुदेव खंडारे,रमेश लक्ष्मण राठोड हे सहभागी होते”तेल्हारा स्टेशन डायरी नुसार वृत्त संकलीत”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button