महाराष्ट्रविदर्भ

मोहोळ नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 579 घरकुलास जास्तीची मुदत वाढ द्यावी*

*मोहोळ नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 579 घरकुलास जास्तीची मुदत वाढ द्यावी*

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी वैजीनाथ धेडे

रमेश बारसकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी मागणी*मोहोळ नगर परिषदेचे प्रधानमंत्री आवास योजनेतील 579 घरकुल रद्द करण्यात आले होते त्यानंतर मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ नगर परिषदेवरती आसूड मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चाच्या माध्यमातून जनभावना लक्षात घेता मुख्याधिकारी यांच्याकडून सदरच्या 579 घरकुलांना 15 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु सदरच्या सात दिवसांमध्ये शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी व उर्वरित पाच दिवसांमध्ये लाभार्थी बांधकामाची प्रक्रिया चालू करू शकत नाही कारण सध्या मार्च एंड असल्यामुळे बऱ्याच नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.शिवाय शहरामध्ये सध्या वाळू मुरूम बंद आहे या गोष्टीचा विचार करता पाच दिवसांमध्ये बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया पुर्ण होऊ शकत नाही त्यामुळे संबंधित 579 लाभधारकांना जास्तीचा वेळ वाढवून देण्यात यावा अशा स्वरूपाची लेखी मागणी रमेश बारसकर यांच्या वतीने मोहोळचे मुख्याधिकारी योगेश डोके यांना करण्यात आले आहे यावेळी भीम युवक दलाचे अध्यक्ष विनोद कांबळे,ज्योती क्रांती परिषदेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता ताई पवार,प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर आधी जण उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button