स्वाभिमानीच्या आंदोलनाची आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात दखल.! ना.अजित पवार यांची भाव वाढीची मागणीसंग्रामपूर /

स्वाभिमानीच्या आंदोलनाची आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात दखल.! ना.अजित पवार यांची भाव वाढीची मागणीसंग्रामपूर /गेल्या २२ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानीने केलेल्या आंदोलनाची दखल आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात आली. विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार यांनी आज बोलतांना स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेत कांदा कापूस सोयाबीनच्या भाव वाढीची मागणी अधिवेशनात रेटून धरली. त्यामुळे या सरकार कडून भाव वाढीची घोषणा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनानुसार २२ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन केले. विदर्भात सर्वाधिक मोठे चक्काजाम आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे झाले होते. विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर आणून याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याची दखल आज राष्ट्रवादीचे नेते नामदार अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आज त्या दिवशीच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा भाषणातून सरकार समोर मांडत कांदा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दूर करा अशी मागणी आज अधिवेशनात रेटून धरल्याचे दिसून आले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाचे यश असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कांदा पीक रस्त्यावर फेकून या सरकारचा निषेध केला होता. याची दखल नामदार अजित पवार यांनी आज प्रकरर्षापणे घेतल्याचे दिसून आले…



