राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची जनजागर यात्रा विदर्भाची पंढरी शेगांव शहरात दाखल*

विदर्भाची पंढरी शेगांव शहरात दाखल* *शेगाव (प्रतिनिधी)* महागाई आणि बेरोजगारी विरोधात काढली जनजागर यात्रा मोटारसायकल रॅली जागर यात्रेचा दुसरा टप्पा सुर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जागर यात्रा सुरू असून,दुसरा टप्पा बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव शहरात दाखल झाली.भाजप सरकार विरोधात जनजागृती व्हावी यासाठी मोटारसायकल रॅली काढली… भाजप सरकारच्या काळात महागाईने वाढली असून , बेरोजगारी सुद्धा वाढली.. तर सरकार मधील मंत्री स्त्री – पुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करतात.. तर शेतकरी वर्गात असंतोष पसरलेला आहे. महिलांची सुरक्षा सुद्धा वाऱ्यावर असल्यानं सरकार बद्दल तीव्र असंतोष नागरिकांत पसरला असून या सरकार विरोधात जनजागृती व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या नंदा ताई पाउलझगडे,सुरेखा ठाकरे विदर्भ समन्वय जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस राष्ट्रवादी अनुजा ताई सावळे,नाझिर काजी साहेब जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पांडुरंग दादा पाटील, दिनेश साळुंके: अॅड. शैलेश पटोकार अध्यक्ष संजय गव्हांदे शहर अध्यक्ष दिनेश सांळुके सह शहरांतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे



