प्रेसनोट यशस्वी सापळा अहवाल

*==* *प्रेसनोट* *==**यशस्वी सापळा अहवाल*▶️ *युनिट -* जळगाव.▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 28रा.नाडगाव, ता.बोदवड जि.जळगाव.▶️ *आलोसे-* *१)* वसंत नामदेव निकम, वय-५२, पो.हे.कॉ./ १५२६, नेम.बोदवड पोलीस स्टेशन ता.बोदवड जि.जळगाव रा.आयटीआय कॉलनी, जामनेर ता.जामनेर जि.जळगाव.*२)* एकनाथ कृष्णा बावस्कर, वय-६५, व्यवसाय-शेतमजुरी (खाजगी इसम ) रा.जलचक्र बु ॥, ता .बोदवड जि.जळगाव.▶️ *लाचेची मागणी-* प्रथम २०,०००/-रू. तडजोडीअंती १६,०००/-रु.▶️ *लाच स्विकारली-* १६,०००/- रू▶️ *हस्तगत रक्कम-* १६,०००/ रू▶️ *लाचेची मागणी -* दि.२४/०२/२०२३▶️ *लाच स्वीकारली* दि.२५/०२/२०२३ रोजी▶️ * लाचेचे कारण-** यातील तक्रारदार हे पत्रकार असून त्यांच्यावर व त्यांचे इतर ३ पत्रकार मित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते अशा चौघांविरुद्ध बोदवड पोस्टेला गु.र.नं.१८७/२०२२ दि.२०/१२/२०२२ रोजी भादवि कलम-३८५, ३४१, ५०६, ३४ अन्वये दाखल असुन संबंधीत गुन्ह्याचा तपास यातील आलोसे यांचेकडे आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी बोदवड पोस्टेला आलोसे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना सदर गुन्ह्यात मदत करून ‘ब’ फायनल पाठविण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींना एलसीबी कार्यालय जळगाव येथे चॅप्टरसाठी न पाठवता तहसिल कार्यालय बोदवड येथे हजर करून चॅप्टर केस करून देण्याच्या मोबदल्यात यातील तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे यांनी प्रथम २०,०००/-रुपये व तडजोडीअंती १६,०००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केलेली रक्कम आरोपी क्रं.१ यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रं.२ यांनी तहसिल कार्यालय बोदवड आवारात पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.वरील आरोपीतांवर बोदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी-* श्री शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. ▶️ *सापळा व तपास अधिकारी-* श्री.संजोग बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि.जळगांव. ▶️ *सहसापळा अधिकारी व पथक-* PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने.▶️ *कारवाई मदत पथक-* स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ .सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.▶️ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. *3)* मा.श्री.नरेंद्र पवार, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी-** मा.पोलीस अधीक्षक सोा. जळगाव.—————————–*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव *@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477**@ मोबा.क्रं. 8766412529**@ टोल फ्रि क्रं. 1064*==================



