शेगावात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त साजरीपरिट समाजातील सरपंच, सदस्य व गुणवंतांचा केला गौरव

शेगावात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त साजरीपरिट समाजातील सरपंच, सदस्य व गुणवंतांचा केला गौरव
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव : येथील परीट समाजा तर्फे संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने स्थानिक वर्धापन भवनमध्ये संत गाडगेबांबांच्या प्रतिमेचे सामुहिक पुजन,परिट समाजातील सरपंच,उपसरपंच,ग्रा प सदस्य तसेच गुणवंतांचा गौरव समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली परिवाराचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरदादा पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून डाॅ अपर्णा संजय कुटे,सावानिवृत्त अधिकारी भारत कडूकार,गजानन जवंजाळ,भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे,आत्माराम वसुलकार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.तत्पूर्वी सकाळी भव्य रथातून संत गाडगेबांच्या प्रतिमेची विचार दिडी काढण्यात आली.श्री ग म मंदिर परिसरातील संत गाडेगबाबाचे पुतळ्याला अभिवादन करून विचार दिंडीची सांगता झाली.टाळ मृदंगाचे ठेक्यावर पाऊली करत,गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला भजन ,स्वच्छतेवरील अभंगगायन विचार दिडीत सहभागी टाळकर्यानी केले, महिलांनी फुगड्या खेळल्या,तर संतांनी सांगितलेल्या स्वच्छतेचा संकल्प यावेळी घेण्यात आला. दिंडीत टाळकरी मुलींची पाऊली सर्वाचे लक्ष वेधून घेत होतीमिरवणूक मार्गावरील श्री अग्रसेन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,शहिद स्मारक, डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.@ समाज बांधव व गुणवंतांचा सत्कार….सौ रूख्मिणी श्रीकृष्ण नांदोकार सरपंच खिरोडा; कैलास वासनकार सरपंच नागापुर, गणेशराव मोकळकार सरपंच रौंदळा,स्वाती गोपाल चांदुरकर उपसरपंच मनसगांव, संतोष नांदोकार सदस्य गोळेगांव बु , गजानन निबाळकर सदस्य खातखेड,सौ. राधाबाई सुधाकर बावस्कार सदस्य तरोडा डी, धनंजय रिधोरकार सदस्य हुई,श्रीमती उषा रामेकर सदस्य मोरगांव डी.तसेच समाजातील उच्चविद्याविभूषितामध्येकु पूजा एकनाथ कडूकार पिंपळगाव नाथ मोताळा उद्योग निरीक्षक महाराष्ट्र शासन ,स्नेहा गणेश गवळी ,अनुराग सजय सुरडकर शेगांवयांचा गौरव करण्यात आला.तर संजय शेजोळे वारकरी मंडळ प्रमुख गौलखेड, कु रोहणीताई, गजानन मोरे , उपाताई सपकाळ सद्भावना भजनी मंडळ,बाळू निंबाळकर, सचिन कडूकार आदीचा सत्कार करण्यात आला.परिट समाजाचे शेगाव तालुकाध्यक्ष किसनराव ईदोकार,वसंतराव हिरळकर,प्रकाश नांदोकार,अशोक कडूकार,संजय सुरडकर, महादेव इदोकर,गणेश गवळी,सहदेव वाकेकर, शिवशंकर निंबाळकर, गजानन कडूकार,सुधाकर बावस्कार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.संचलन संजय सुरडकर यानी केले,आभार महादेव इडोकार यांनी मानले.



