खानदेशमहाराष्ट्रसांस्कृतिक

श्री गणेश विघामंदिर दातिवली दिवा या शाळेत महाशिवरात्र व प्राथमिक विभागाचे स्नेह संम्मेलन संपन्न .

श्री गणेश विघामंदिर दातिवली दिवा या शाळेत महाशिवरात्र व प्राथमिक विभागाचे स्नेह संम्मेलन संपन्न .दिवा –

( सचिन शेलवले )

शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री .गणेश विद्या मंदिर या शाळेत शनिवार दिनांक 18/2/2023 रोजी सकाळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी संस्थेच्या महादेवाच्या मंदिरात महादेवाला अभिषेक घालण्यात आला . दिव्यात जवळच महादेवाचे मंदिर असल्यामुळे दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी लोटली होती . मंदिरांची फुलांनी सुंदर सजावट तसेच पूर्ण शाळेला लाईटची रोषणाई तसेच मंदिराला सुद्धा रोषणाई करण्यात आली होती . भाविकांसाठी प्रसादाची सोय संस्थेतर्फे करण्यात आली होती . दुपारी ग्रामस्थ भजनी मंडळ दातिवली यांचे सूश्राव्य भजन झाले . श्री गणेश विद्या मंदिर दातिवली प्राथमिक विभागाची वार्षिक स्नेह संम्मेलन सायंकाळी ठिक 5.00 वाजता आयोजित करण्यात आला होता . त्यासाठी स्टेजच्या पुढे पालकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती . समोर पाहुण्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती . स्टेज मुलांनी कार्यानुभव मध्ये बनविलेल्या वस्तुंपासून सजवण्यात आला होता . पुष्प गुच्छ मुलांनी रंगीत कागदापासुन सुंदर रित्या तयार केल्या होत्या . पाहुण्यांच्या स्वागतासाठी ढोलताशे लेझीम पथक व विद्यार्थी पोलीसांची फौज सज्ज होती . वार्षिक स्नेह संमेलनासाठी प्रमुख पाहूणे म्हणुन मेस्टा संघटनेचे संस्थापक संजय तायडे तसेच महाराष्ट्र राज्याचे कोकण विभागीय मेस्टा संघटनेचे अध्यक्ष गजानन पाटील तसेच रोकडे सर , ठाणे जिल्हा मेस्टाचे अध्यक्ष नरेश पवार तसेच संस्थेच्या अध्यक्षा लिलावती म्हात्रे मॅडम ,संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे , दिनेश म्हात्रे , गिता म्हात्रे मॅडम, केतकी म्हात्रे मॅडम हे संस्थेचे पदाधिकारी , केतकी म्हात्रे मॅडमचे वडिल दिनकर म्हात्रे तसेच आई रश्मी म्हात्रे तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीराम चौधरी व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल भोईर सर तसेच श्री गणेश विघामंदिर सर्व प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक व माय मदर इंग्लिश स्कुल व बाल जिजाऊ संस्कार केंद्रांचे सर्व शिक्षक वृंद व पालक आणि त्यांची मुले, बाल कलाकार हे उपस्थित होते . प्रथमता कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाली . त्यानंतर मुलींनी ईशस्तवन व स्वागत गीत पेटी व ढोलकी , डफ, खंजेरीच्या तालासुरात म्हटले व वातावरण प्रसन्न व आनंदमय केले . त्यानंतर स्टेजवर उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे तसेच मुख्याधापक अनिल भोईर सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल भोईर सरांनी केले . तसेच सुत्रसंचालन पूनम मॅडम , इंद्रजित करटुले व रविंद्र मोंडुळे यांनी केले . कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक गाणे यारे या गाण्याने दमदारपणे सुरुवात झाली . दुसऱ्या दिवशी शिवजयंती असल्यामुळे शिवजयंतीवर आधारीत सुद्धा गाणी घेण्यात आली होती . प्राथमिक विभागाची एकुण २४ गाणी मराठी गाणी, हिंदी गाणी, देशभक्तीपर आधारीत गाणी, वारली शेतकरी नृत्य , आताचे शैक्षणिक धोरण , देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेली फौज यावर आधारीत गाणे, भुताटकीचे गाणे , जंगली आधारीत मोगली गाणे तसेच परंपरांगत चालत आलेले लोकनृत्य , लावण्या असे अनेक गाण्यांवर लहान लहान बाल कलाकार चांगल्या प्रकारे एकास एक सादरीकरण करत होते . त्यामागे मुलांची विशेष मेहनत त्यांच्या पाठीमागे असलेली शिक्षकांची मेहनत व पालकांचे विशेष सहकार्य जाणवत होते . प्रत्येक गाण्यांना पालकांकडून तसेच प्रेक्षक वर्गाकडून टाळ्यांचा चांगला उत्तम प्रतिसाद मिळत होता . कलाकारांसाठी नास्त्याची सोय करण्यातआली होती . डीजे सिस्टीम चांगल्या प्रकारे करण्यात आली होती .प्रत्येक गाण्याला फटाक्यांची आतिषबाजू ऐकायला मिळत होती . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रवि पाटील डोंबिवली, चेतन पाटील दिवा, सुमित भोईर, अभिषेक ठाकुर, रमेश म्हात्रे, सत्संग परिवार यांनी विशेष भेट देवून कार्यक्रमाला शोभा आणली . शेवटच्या क्षणापर्यंत पालकवर्ग जागेवरून हलले नाहीत त्यांचे विशेष सहकार्य लाभले . शेवटी सर्व शाळेचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, माय मदर इंग्लिश मिडियचे तसेच बाल जिजाऊ संस्कार केंद्राचे सर्व शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडुन पुष्पगुच्छ देऊन यथोश्चित सत्कार करण्यात आला . व कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गिताने करण्यात आला .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button