गावातील रस्त्याच्या कामासाठी रायल्टी भरून गौणखनिजांची परवानगी देण्यात यावी अन्यथा

कजगाव ता.भडगाव:गावातील रस्त्याच्या कामासाठी रायल्टी भरून गौणखनिजांची परवानगी देण्यात यावी अन्यथा दि.१३ रोजी कजगाव बसस्थानक चौकात रास्तारोको आंदोलन उभारण्याचा इशारा लोकनियुक्त सरपंच सह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे निवेदनाच्या प्रति वरिष्ठांना पाठविण्यात आल्या आहेत कजगाव ग्रामपंचायत हद्दीत गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन निधी मंजूर केला तसेच टेंडर सुद्धा मंजुर केले परंतु या रस्त्यांसाठी गौण खनिज नसल्याने रस्त्यांचे कामे रखडलेले असुन रॉयल्टी भरून गौण खनिजाची परवानगी द्यावी असे निवेदन कजगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आज भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना दिले.या निवेदनात म्हटले आहे की,शासकीय यंत्रणेने मौजे कजगाव येथील रस्ते विकसित करण्याकरीता मंजुरी दिलेली आहे. सदरचे रस्ते विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे काम दिले असुन काम करण्यासाठी कायदेशीर रॉयल्टीची रक्कम घेऊन मौजे कजगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागेतुन गौण खनिजाची परवानगी द्यावी. शासनाने कजगांव येथील गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे, सदरचे रस्ते विकसित करण्याकरिता निधी मंजुर होऊन टेंडर पास होऊन, संबंधित अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर २० जुन रोजी कॉन्ट्रक्टर यांना दिलेली आहे परंतु आपल्या कार्यालयामार्फत गौणखनिज वाहतुक परवाना मिळत नसल्यामुळे गावातील रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत पावसाळयाचे दिवस असल्यामुळे आणि रस्त्यांची जागा काळी मातीची असल्यामुळे जुन्या रस्त्यांवर खड्डे निर्माण झालेले आहेत. अशा परिस्थितीत गावाच्या लोकांना पायी चालने शक्य होत नसल्याने शासकीय परवानगी दिल्यानंतर देखील आपण परवाना देत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत ग्रामपंचायत कजगाव व ग्रामस्थ यानी एकत्र येऊन, सभेमध्ये निर्णय घेऊन गावातील रस्ते विकसित करणे करीता आपल्याकडुन गौणखनिज परवाना न मिळाल्यास ग्रामस्थ येथील बसस्थानक चौकात १३ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रस्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर सरपंच रघुनाथ महाजन, सदस्य पुंडलिक सोनवणे, अक्षय मालचे,सादिक गणी मण्यार, कविता महाजन,अंजना सोनवणे,वैशाली हिरे,समाधान पवार, स्विटी धाडीवाल , पल्लवी पाटील ,सत्यभामा कोळी,मांगीलाल मोरे , शोभाबाई बोरसे ,यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव,पोलिस अधीक्षक जळगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव,उपविभागीय अधिकारी पाचोरा,पोलिस निरिक्षक भडगाव यांना देण्यात आल्या आहेत



