महाराष्ट्रसामाजिक

मालेगाव येथील सम्राट अशोक नगर येथे दिनांक १८ व १९ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय धम्म प्रशिक्षण

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड) 👉🏻मालेगाव :- मालेगाव येथील सम्राट अशोक नगर येथे दिनांक १८ व १९ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबिर चे आयोजन केले असून यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न मला भारत बौद्धमय करायचा आहे असं म्हटलं होत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धम्मकाया फाऊंडेशन व धममकाया फेडरेशन अंतर्गत एक विश्व बौद्ध मिशन या संघटने द्वारे धम्म परिषदेचे आयोजन केले आहे.भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने बौद्ध धम्म जनमानसात रुजवणे आवश्यक आहे त्याकरिता धम्मकाया फाउंडेशन विविध प्रशिक्षण शिबिरे, सामनेर शिबिरे, बाल संस्कार शिबिरे, व धर्म संमेलने आयोजित करुन धम्माचा प्रचार व प्रसार सन २००८ पासुन अविरतपणे करीत आहे .👉🏻यावेळी प्रमुख मार्गदर्शन अँड.प्रवीण पंडित उल्हासनगर, भिमराव घनसावंत उल्हासनगर, अनिल बागुल नाशिक, सचिन गायकवाड नाशिक, शैलेश कापसे नागपूर, प्रकाश मोरे अंबरनाथ,ठाणे, सुमित भालेराव कर्जत – रायगड , मनोज सावळे मालेगाव – वाशिम , वैशालीताई महाजन डोंबिवली – ठाणे, मधुरीताई भालेराव कर्जत – रायगड, शीतल सावळे मालेगाव – वाशिम हे करीत आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक सम्राट मित्र मंडळ, भिमशक्ती मित्र मंडळ व पंचशील नवयुवक मंडळ मालेगाव हे असुन या कार्यक्रमांमध्ये हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button