गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आपसी वादातून 37 वर्षीय पत्नीची हत्या केल्याच्या आरोपावरून पतीस अटक

**अडसूळ शिवारातील स्वामी ब्रिक्स विट भट्ट्यावरील घटना*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर तेल्हारा पो.स्टे.अंतर्गत येणाऱ्या आडसूळ शिवारातील स्वामी ब्रिक्स वीट भट्ट्यावरील मजूर असलेल्या पती-पत्नीतील आपसी वाद विकोपाला जाऊन पतीने जळक्या लाकडाने 37 वर्षीय पत्नीची मारहाण करून जखमी पत्नीची निर्दयीपणे,निर्गुण हत्या केल्याची घटना गुरुवार दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता दरम्यान उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.याबाबत वृत्त असे की,तेल्हारा तालुक्यातील आडसूळ शिवारात अंदुरा पुलानजीक असलेल्या स्वामी ब्रिक्स नामक विट भट्ट्यावर मजूर म्हणून काम करणाऱ्या अरविंदकुमार कांताप्रसाद रा.फैजाबाद (उत्तर प्रदेश)नामक आरोपीने त्याची पत्नी नामे सौ.सरोजदेवी अरविंद कुमार (37)रा.फैजाबाद (उत्तर प्रदेश)ह.मु.ब्रिक्स वीट भट्टी आडसुळ शेत.शिवार ता.तेल्हारा हिस आपसी वादात दि.16 फेब्रुवारी चे सकाळी 8:30 वाजे पूर्वी जळक्या लाकडाने निर्दयपणे मारहाण केली, मारहाणीत तिचे कानातून रक्त निघाले,डोक्याला जखम झाली, डावा तळपाय फ्रॅक्चर झाला व तिचा मृत्यू झाला. फिर्यादी राम सुधाकर वाकोडे (दिवाणजी) रा.तेल्हारा याने पोलिसांना घटनेची माहिती दिली असून पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून पत्नीचा खून केल्याचा आरोपावरून नमूद आरोपीला अटक केली.तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामादि प्रक्रिया पूर्ण केली असून घटनास्थळाला बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज, एलसीबीचे अधिकारी, हिवरखेडचे पीएसओ ,तपास अधिकारी गणेश कायंदे ,चव्हाण इत्यादींनी भेटी दिल्यात. नमूद आरोपी विरुद्ध तेल्हारा पोलिसांनी भांदवीच्या 302 कलमान्वये दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेनंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पीएसआय गणेश कायंदे करीत आहेत…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button