ऐतेहासिक निर्णय : शिंदे गटाला मिळाले शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह, मुक्ताईनगर शिवसैनिकांचा

मुक्ताईनगर प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षावर मोठा ऐतेहासिक निर्णय दिलेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागलेला असून आता शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे मिळाले असून हा निर्णय जाहीर होताच संत मुक्ताईनगर येथे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना प्रवर्तन चौकात जमून एकच जल्लोष केला प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी व dj च्या तालावर शिवसेना गीताच्या चालीवर प्रचंड जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, सुनील पाटील ,.अफसर खान, पंकज राणे,गोपाळ सोनवणे, अमरदीप पाटील, दिलीप पाटील ,नगरसेवक गटनेता राजेंद्र हिवराळे, गणेश टाँगे ,संतोष मराठे, युनूस खान , आरिफ आझाद, वसंत भलभले , प्रकाश गोसावी, किरण कोळी, अशोक कुंभार , मुकेश माळी, गोलू मोऱ्हे,शिवराज पाटील, प्रवीण भोई, योगेश पाटील, विजय मराठे, शुभम शर्मा, मजीद खान, सलीम खान , संतोष माळी, गणेश टोंगे, मनोज मराठे, आकाश भोई, पवन भोई, संदीप पाटील, अर्जुन भोई आदींसह असंख्य शिवसैनिक बांधव उपस्थित होते.



