महाराष्ट्र

भोनगाव येथे संत नगरी ॲग्रो कंपनीच्या कार्यालयाचे प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते उद्घाटन.

.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे शासकीय हमी भाव योजनेअंतर्गत नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यासाठी संत नगरी ॲग्रो कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाचा हमीभाव मिळावा यासाठी संत नगरी ॲग्रो कंपनीच्या वतीने पुढच्या आठवड्या पासून नोंदनी करून लवकरच भोनगाव येथे खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी केल्या जाणार आहे, त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी चालु केलेल्या कंपनीचे संचालक चेतन झामरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी उद्घाटनप्रसंगी कंपनीचे संचालक चेतन झाबरे यांच्यासह आशिष देशमुख, संतोष गायकवाड,नितीन भिसे, सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button