शेतकऱ्यांवर लाठी चार्जचा स्वाभिमानी कडून अनोखा निषेध,

*शेतकऱ्यांवर लाठी चार्जचा स्वाभिमानी कडून अनोखा निषेध,
वेलेन्टाइनच्या दिवशी पोलिसांना दिले गुलाबाचे फुलं*
वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव: बुलढाणा येथे १२फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज करत स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर व विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांच्यासह २४ कार्यकर्त्यांना अटक केली याच्या निषेधार्थ आज मालेगाव येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना चक्क गुलाबाचे फुल देऊन वेलेन्टाइन च्या दिवशी प्रेम वाटण्याचा संदेश दिला आहे.पीकविमा, अतिवृष्टीची मदत, सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी या मागण्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून रान उठवले होते. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रंचड नुकसान झालेले असतांना शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होत नसल्याने व अतिवृष्ट मदद, सोयाबीन कापसाच्या भावात वाढ करावी या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली दामुअण्णा इंगोले यांनी रिसोड व मालेगाव येथे हजारो शेतकऱ्यांना घेऊन मोर्चे काढले होते. मात्र त्यानंतरही एआयसी कंपनीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली नव्हती. व सरकाने नुकसानभरपाईची रक्कमही दिली नाही. त्यामुळे आक्रमक होत. रविकांत तुपकर यांनी बुलढण्यात शनिवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. आता या प्रकरणात,रविकांत तुपकर व दामुअण्णा इंगोले यांना अटक झाल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. व लाठीचार्जचा निषेध म्हणून १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शेलुफाटा मालेगाव येथे रास्तारोको आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख बालाजी मोरे यांनी दिली आहे.




