
आज श्रींचा १४५ वा प्रगटदिन उत्सव
संतनगरी शेगावामध्ये हजारांवर दिंड्या : शहरात चोख बंदोबस्त
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव, ता. १२ : श्रीं च्या प्रगटदिन उत्सवानिमित्त शेगावात जय गजानन श्री गजानन, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष व अभंग, गवळणी गायन करत टाळमृदंगाचे निनाद करत शेकडो भजनी दिंड्यांचे आगमन होत आहे. आतापर्यंत १००० च्या वर दिंड्या दाखल झाल्या असून, शहराला जोडणाऱ्या चारही बाजुच्या रस्त्यावर भगव्या पताकाधारी वारकरी दिसत आहेत.
गत दोन वर्षापासून कोरोनाच्या सावटामुळे श्रीं चा प्रगटदिन महोत्सव अंतर्गत स्वरुपात साजरा करण्यात आला. परंतू, आता कोरोनाचे मळभ दूर झाले असून, यावर्षी मोठ्या उत्साहात प्रगटदिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रगटदिनानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हेतर मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड राज्यातील
दिंडी सोहळा,
महोत्सव पायदळ वारी
शेगाव : गजानन महाराज संस्थानमध्ये दाखल झालेली पालखी.
भजनी दिंड्या संतनगरीत दाखल होत असल्याचे चित्र आहे. महारूद्र स्वाहाकार यागाने या सोहळ्याची सुरुवात झाली असून, उद्या दुपारी श्रींच्या रजत मुखवट्यासह पालखी अश्व, रथ, मेणा भगवे पताकाधारी वारकरी यांच्यासह पालखी सोहळा मंदिर परिसरातून निघणार आहे. तसेच १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ ते ८ प्रमोदबुवा राहणे पळशी यांच्या
काल्याचे किर्तनाने प्रगटदिन उत्सावाची सांगता होईल. शहरात दाखल झालेल्या दिंड्यांची संस्थानच्या वतीने योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून, शहरात चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर निर्बंधमुक्त साजऱ्या होत असलेल्या उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.



