गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

देसी पिस्टल तसेच चार काडतुसासह तिघांना बेड्या बुलढाणा एलसीबी पथकाची मोठी कारवाई

देसी पिस्टल तसेच चार काडतुसासह तिघांना बेड्या बुलढाणा एलसीबी पथकाची मोठी कारवाई

  • शेगाव प्रकट दिनाच्या दिवशी खडबड उडवणारी बातमी समोर आलेली आहे आरोपी सदर संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावातील असून यातील एक अल्पवयीन आरोपी सुद्धा आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव वरवट रोडवरील बुरुंगुले शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. पातुर्डा येथील शेख अकबर शेख हारून (२१), जिवन तेजराव गाडे (१८) आणि एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असे तिघे रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकल ने शेगावकडे येते होते. एलसीबी पथकाला याबाबतची माहिती मिळाली. शेगावकडे येणाऱ्या तिंघाजवळ देशी पिस्टल आणि जिवंत काडतुसे असल्याचे गोपनीय सूत्रांनी एलसीबी पथकाला सांगितले.मिळालेल्या माहितीच्या आधारे शेगाव वरवट रोडवरील बुरुंगुले शाळेजवळ एलसीबी पथकाने सापळा रचून तिघाही आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून १ देशी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, १ मोटारसायकल, ३ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींची कसून चौकशी केली असत देशी पिस्टल शेगावात विकण्याचा त्यांचा प्लॅन होता असे समोर आले. तिघाही आरोपींच्या विरोधात शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • ही कारवाई एसपी सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात( खामगाव), बबन महामुनी ( बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकॉ सुधाकर काळे, नापोकॉ संजय नागवे,नापोकॉ अनंता फरतळे व चालक मधुकर रगड यांनी केली.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button